Pages

Sunday, March 4, 2012

कविराज भूषण कोण होते ? (कवि भूषण यांच्या शब्दात)

  • कविराज भूषण कोण होते ? (कवि भूषण यांच्या शब्दात)
    देस न देस न ते गुणीजन आवत, ज्याचन ताही | तिनमे आयो एक कवि, भूषण कहियतु जायी ||
    द्विज कन्नोज कुल कश्यपी, रत्नाकरसुत धीर | वसत त्रिविक्रमपुर सदा, तरणी तनुजा तीर ||
    वीर बीरबल से जहाँ उपजे, कवी अनुभुप | देव बिहारिश्वर जहाँ, विश्वेश्वर तद्रूप ||
    कुल सुलंक चितकुटपती, साहसशील समुद्र | कवी भूषण पदवी दै, ह्रुदयरामसुत रुद्र ||
    अर्थ :
    विविध देशातुन त्यांच्याकड़े(शिवराय) गुणीजन येतात
    त्यांच्यामधे भूषण म्हणुन एक कवी आला आहे.

    कनोजी ब्राह्मण
    , कुल कश्यप आणि रत्नाकराचा मुलगा
    यमुना तीरी असणाय्रा त्रिविक्रमपुरला राहतो.

    हा कवी वीर बिरबलाच्या भुमितुन जेथे

    बिहारिश्वराचे वास्तव्य आहे तेथून आला आहे.

    कुल सुलंक चितकुटपती
    , साहसशील समुद्र असणाय्रा
    राजा ह्रुदयरामाचा मुलगा रुद्र याने
    भूषण ही पदवी दिलेली आहे.
भुषणाच्या 'शिवभुषण' या ग्रंथात ३८२ छंद आहेत. हा खरा अलंकार शास्त्रवारील ग्रंथ आहे. १०५ अलंकारांच्या व्याख्या दिल्या आहेत आणि त्यांच्या उदाहरणे स्वतःच सांगितली आहेत. या ग्रंथाचे नायक शिवराय आहेत.

'शिवाबावनी' हा भुषणाने लिहीलेला ग्रंथ नसून त्याचे ५२ छंद एकत्रितपणे गुजराथेतून प्रसिद्ध करण्यात आले आहेत
याशिवाय श्री. रामचंद्र गोविंद काटे यांचा 'संपूर्ण भुषण' हा ग्रंथ १९३० मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

तसेच श्री दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, बाळ कोल्हटकर,काव्यरत्नावलीकार फडणीस इ. नी भुषणाच्या काव्याचे मराठी पद्यानुवाद केलेले आहेत.

No comments:

Post a Comment