शिव-सह्याद्री मासिक-वर्ष दुसरे-अंक पहिला-जानेवारी-२०१४
छत्रपती
शिवाजी महाराज आणि अनादी काळापूर्वी प्रगट झालेला सहयाद्री हेच
महाराष्ट्राचा इतिहास-वर्तमान आणि भविष्य असं जरी म्हणलं तरी ती
अतिशयोक्ती होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे
शक्तीपीठ तर सह्याद्री महाराष्ट्राचा मूलाधार. महाराष्ट्र घडविला तो या
दोघांनीच. सुलतानांची गुलामगिरी हेच आयुष्याचे इति कर्तव्य समजणाऱ्या
कणाहीन झालेल्या समाजाला महाराजांनी भानावर आणलं.एवढचं नाही तर जगाने कौतुक
करावे आणि अखिल हिंदूस्थानाने अभिमान बाळगावा असं राज्य छत्रपती शिवाजी
महाराजांनी सह्याद्रीच्या साक्षीने उभे केले.बाराशेव्या शतकापासून भारतात
प्रस्थापित झालेल्या आणि स्थिरावलेल्या सर्व सुलतानांच्या टोळधाडी छत्रपती
शिवाजी महाराज आणि सह्याद्री यांनी थोपवल्या.नुसत्या थोपवल्या नाही तर किती
तरी शाह्या विकलांग करून शरपंजरी पाडल्या.बंगाल पासून इराण-इराक पर्यंत
अथांग पसरलेल्या मोंगलशाहीचा पातशहा औरंगजेबाचे सुद्धा दक्षिण विजयाचे
स्वप्न स्वप्नच राहिले,ते फक्त आणि फक्त शिवराय आणि सह्याद्री
यांच्यामुळेच.
अश्या युगप्रवर्तक सर्वगुणसंपन्न छत्रपती शिवाजी महाराजांना,आणि मूलाधार सह्याद्रीला "शिव-सह्याद्री" परिवाराचा त्रिवार मुजरा............ छत्रपती शिवाजी महाराज आणि मूलाधार सह्याद्रीला स्मरून हे ई -मासिक (PDF) सर्व “शिव-सह्याद्री” प्रेमींना अर्पण करतो...........
अश्या युगप्रवर्तक सर्वगुणसंपन्न छत्रपती शिवाजी महाराजांना,आणि मूलाधार सह्याद्रीला "शिव-सह्याद्री" परिवाराचा त्रिवार मुजरा............ छत्रपती शिवाजी महाराज आणि मूलाधार सह्याद्रीला स्मरून हे ई -मासिक (PDF) सर्व “शिव-सह्याद्री” प्रेमींना अर्पण करतो...........
:-रवी राजेंद्र पवार
"शिव-सह्याद्री"
हे ई-मासिक प्रत्येक महिन्याला अगदी निशुल्क प्रसिद्ध केले जाते.संपूर्ण
मासिक ओळखीच्या लोकांना फ़ॉरवर्ड करू शकता.जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत
"शिव-सह्याद्री" विचार नेणे हेच आपले एकमात्र ध्येय आहे.
shiv shyadri