Showing posts with label सुवर्णदुर्ग. Show all posts
Showing posts with label सुवर्णदुर्ग. Show all posts

Tuesday, April 10, 2012

सुवर्णदुर्ग

सुवर्णदुर्ग
 

हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड
दुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे असे म्हणतात.
उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकर्‍यांच्या दोन देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहेबांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत.
दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो. गडावर सात विहिरी आहेत, पण कुठेही मंदिर नाही.
प्रसिद्ध दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी हिचे इथले देऊळ कान्होजीने केव्हातरी सुवर्णदुर्गावरून हलवून देवीची स्थापना अलिबागच्या हिराकोटामध्ये केली होती.
मुंबई गोवा महामार्गावर असणार्‍या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे. हर्णे बस स्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते.

बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात. ऐन सागराच्या कुशीत वसलेल्या या जलदुर्गावर आज पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने सोबत पाणी घेऊन जावे.
Website Security Test