Sunday, April 28, 2013

रामजी पांगेरा


दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला.
या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेलेहोते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला
मराठ्यांच्या ताब्यातहोता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.
कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता.
कारण मोगलांच्या फौजा केव्हा
स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा.
हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर
थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ ) त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता.
एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की , औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ
घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती.
ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर
जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला.
तो आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला
समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला , ‘ मर्दांनो , खानाशी झुंजायचंय ,
जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळी
बांगडी ‘ असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे
घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले.
मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच…
वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा
आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता.
अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की ,
मराठीयांची पोरे आम्ही , भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला.
कण्हेरा गडाला दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती.
त्यातलाच हा रामाजी पांगेरा. इतिहासाला त्याचं घर माहीत नाही , त्याचं गाव माहीत नाही , त्याचा ठाव
माहिती नाही. त्याचा पराक्रम मात्र माहिती आहे. आणि आम्हाला रामाजीही माहिती नाही आज अन् कण्हेरागडही माहीत नाही
आज.कदाचित पुढे मागे संशोधकांना या रामाजी पांगेऱ्याची अधिक माहिती कागदपत्रांतून मिळेल.
अन् काळोखातून उन्हाचा कवडसा उजळत यावा तसा
त्याचा इतिहास आमच्या काजळलेल्या काळजात प्रकाश टाकेल.

24 comments:

  1. जसे महाराजांचे स्टेटस तयार केले तसे सर्व मावळ्यांचे बनवा त्यांचे व त्यांच्या पराक्रमाचे कारण स्टेटस सर्व ठेवतात व पाहतात शेर करतात या कारणामुळे सर्व लोकांपर्यंत सर्व महाराजांचा व मावळ्यांचा त्यांनी केलेला पराक्रम सर्व लोकांपर्यंत पोहोचेल ही आपणास विंनती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    ReplyDelete
    Replies
    1. खुप चांगली कल्पना आहे

      Delete
    2. खर आहे आपल्या मावळ्यांची माहिती पण मिळाली तर बरे होईल, असा जाणताराजा आणि असे मावळे परत होणे नाहीत.

      Delete
  2. मराठ्यांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला

    ReplyDelete
  3. मी एके ठिकाणी वाचले होते, रामजी या युध्दात कामी आले.महाराज जातीनिशी त्यांच्या वडिलांला भेटायला गेले. त्यावेळी त्यांनी सोन्याच्या मोहर्याचीं थैली देवू केली.पण पांगेरा कुटुंबांने ती नाकारली. रामजींचे वडील म्हणाले"रामजी गेला मग आम्ही तो स्वराज्याच्या कार्यात नोकरी वर नसताना सरकारी पैसा कसा घ्यावा.एक विनंती आहे आम्ही जे देऊ ते मात्र तुम्ही घ्यावं" त्यानीं लहान मुलाला बोलावलं त्याचा हात महाराजांच्या हातात देत म्हणाले"याला स्वराज्याच्या सेवेत घ्या.मला आणखी
    मुलं असती तर ती ही दिली असती." महाराजांना गहिवरून आले.... सरकारी पेन्शन नाकारुन म्हातारपणीचा आधारही स्वराज्यासाठी देणारा बाप...

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीमान योगी कादंबरी मध्रयेणजीत दैसाई ह्यांनी छान वर्णन केले आहे ह्या युद्धाचे आणि रामजी पांगेरा चे

      Delete
    2. सहस्त्रकोटी प्रणाम!!! ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्र आणि देश जिवंत आहे! अशा महान सुपुत्रंचा व त्यांच्या वंशजांना जनतेने सन्मानित करणे अत्यंत आवश्यक आहे,पुढच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक.

      Delete
  4. सर रामजीराव पांगेरा देशमुख यांचे वंशज आहेत
    दे सद्या दोन ठिकाणी आहेत एक नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरी व नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खडकतळे . व आम्ही आहोत खडकतळे येथील पातीचे वंशज. व हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी सद्या माझे प्रयत्न सुरू आहेत. तो लवकरच लिखित स्वरूपात येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. साहेब तुमचा नंबर भेटेल का .... आम्हाला रामजी पांगेरा या आपल्या शूर मावळ्या बद्दल माहिती हवी आहे
      माझा नंबर
      पियुष अवसरे
      7972149442

      Delete
    2. याशिवाय कळवण,उत्राणे,व खुंटेवाडी या ठिकाणी त्यांचे वंशज आहेत.

      Delete
    3. साहेब
      मला रामजी पांगेरा यांच्या विषयी पूर्ण माहिती हवी आहे
      विनंती करतो मला तुमचा मोबाइल नंबर किंवा अड्रेस दयावा
      मी शिर्डी जवळील पुणतांबा गावचा आहे

      Delete
    4. मी पांगरीचा आहे पण पांगेरा आणि आमच्या गावाचा काही संबंध आहे असं मी कधी ऐकलं नाही की वाचलं नाही.. अधिक माहिती सांगू शकाल का ... माझा संपर्क क्रमांक - ७६६६८६१९४१ संकेत पगार

      Delete
    5. मी दिनेश पाटील राहणार भिवंडी मी ही माहिती व्हिडिओ मार्फत लोकांसमोर मांडायचा विचार करतो जर तुमच्या जवळ अधिक माहिती असेल तर मला द्या. 9561956333
      माझा YouTube वर चनेल आहे DineshPatilvlogs या नावाने.

      Delete
  5. स्वराज्यासाठी प्रत्येक मावळ्यांचे योगदान आम्ही कधी नाही विसरू शकत.

    ReplyDelete
  6. हो मी वाचले आहे रामजी पांघेरा यांच्या विषयी श्रीमान योगी कादंबरीत.

    ReplyDelete
  7. जय जिजाउ जय शिवराय जय भवानी

    ReplyDelete
  8. नाशिकहून कळवणला जातांना वणीच्या पुढे व नांदुरी च्य अलीकडे एक घाट लागतो. अजिंठा सातमाळा डोंगरांची रांग येथून चांदवड व अणकाईकडे जाते. नाशिक कळवण रस्ता हत्या डोंगररांगांना येथे छेदतो. तेथे कन्हेरवाडी हे गाव आहे.pin code 423501 आहे. तेथे जवळ अहिवंतवाडी व अहिवंतगड आहे. ही रामजी पांगेराची लढाई कन्हेरवाडी गावाजवळ झाली असावी, परंतु जवळचा किल्ला अहिवंतगड असावा. येथून 15 किलोमीटरमध्ये मार्कंडा, रावळ्या, जावळ्या, काचनगड, धोडप्या, असे किल्ले आहेत.

    ReplyDelete
  9. गूगल विकिपीडिया वर असे आहे की दिलेरखान ने पुन्हा हल्ला केला व् त्यामधे सगळ्या मावळ्यांना वीरमरण आले खरा इतिहास कोणता आहे

    ReplyDelete
  10. https://youtu.be/AO5-Hc54bS8

    नक्की पहा माझा व्हिडिओ - औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय बोलतो ते.. 🙏🏻🚩

    ReplyDelete
  11. नाशिकहून कळवणला जातांना वणीच्या पुढे व नांदुरी च्य अलीकडे एक घाट लागतो. अजिंठा सातमाळा डोंगरांची रांग येथून चांदवड व अणकाईकडे जाते. नाशिक कळवण रस्ता हत्या डोंगररांगांना येथे छेदतो. तेथे कन्हेरवाडी हे गाव आहे.pin code 423501 आहे. तेथे जवळ अहिवंतवाडी व अहिवंतगड आहे. ही रामजी पांगेराची लढाई कन्हेरवाडी गावाजवळ झाली असावी, परंतु जवळचा किल्ला अहिवंतगड असावा. येथून 15 किलोमीटरमध्ये मार्कंडा, रावळ्या, जावळ्या, काचनगड, धोडप्या कण्हेरगड, असे किल्ले (कळवण-ओतुर-सादडविहीर-आठंबे दरम्यान कण्हेरगड आहे) .

    ReplyDelete
  12. रामजी पांगेरा यांचे समाधी स्थान कोठे आहे कळू शकेल का

    ReplyDelete
  13. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    ReplyDelete

Website Security Test