शिवराय छत्रपती आमुचा निधडया छातीचा शूर बाण्याचा प्रणेता महाराष्ट्र धर्माचा..... जी जी जाहला संत श्रीमंत राजा कुळवंत गुणी गुणवंत झाला ना दुजा आजपर्यंत... जी जी राजाचे रूप देखणे कसे चालणे कैसे बोलणे झुकावी नजर, मान गर्वाने ... जी जी जलदुर्ग भले बांधले गडा निर्मिले मर्द मावळे मराठे अवघेची मिळविले .... जी जी युद्धात गनिमी कावा लढे तो छावा जाणुनी भावा यवन मग करीत अल्लाचा धावा .....जी जी परस्त्री मातेसम मानिली दिली सावली कदर दाविली करून सन्मान लाज राखली ....जी जी न्याय नीती कठोर निष्ठुर असो सरदार आप्त वा पुतर सजा ना कुणालाच चुकणार ....जी जी जीवा,शिवा,बाजी तानाजी लाउनि बाजी झाले रणगाजी जखम परी काळजाची ताजी ....जी जी राजाची नजर पारखी कुणा पालखी समस्ता राखी वाढली कीर्त तीनही लोकी ... जी जी आई भवानीची तलवार शत्रूवर वार करून बेजार झुंजला राजा अपरंपार ...जी जी शक्ती ,युक्ती ,राजकारण धर्म रक्षण देव ब्राम्हण राजा झाला शिव कल्याण .... जी जी शिवराय नृपती तो धन्य त्रिलोकी मान्य दुजा न अन्य होऊया त्याचे चरणि अनन्य ...जी जी
No comments:
Post a Comment