कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती
रणी झेलतो सिंहासा छातीवरती
श्री शिवाजी महाराजांनी कोकण प्रांतात वादळी चढाई मांडीत कित्येक जलदुर्ग, गिरीदुर्ग ,बंदर आणी ठाणी स्वराज्याच्या अधिपत्याखाली आणली. हिंदवी स्वराज्याची भागावी ध्वजा सागरी किनारपट्टीवर मोठ्या दिमाखात फडकू लागली होती. सुसज्ज मराठी आरमार खवळत्या समुद्रावर सत्ता गाजवू लागलं होतं.
स्वराज्याचा विस्तार दिवसेंदिवस वेगाने वाढतच होता
कोकणाच्या तुफानी मोहिमेत राजांना अनेक मोलाची रत्ने गवसली. निष्ठेची आणी कडक शौर्याची हि पोलादी रत्ने होती. या रत्नांमध्ये मायनाक भंडारी , वेंटाजी बाटकर , दौलतखान , इब्राहीमखान , लायजी पाटील कोळी , तुकोजी आंग्रे सारखे दर्यावर्दी होते. या साऱ्यांमध्ये पराक्रम, महत्वकांक्षा आणी दूरदृष्टी सागराएवढी विशाल होती. श्रीशिवाजी महाराजांवर स्वराज्याची अस्मिता या दर्याविरांमध्ये जागी केली. स्वराज्याचा शेला त्यांचे अंगावर पांघरीत हि निष्ठावंत हृदये
स्वराज्याच्या पवित्रकार्यात सहभागी करून घेतली
मायनाक भंडारी हे दर्यासारंग यांच्या बरोबरीने स्वराज्य आरमाराचे सुभेदार होते.पराक्रम मायनाक भंडारींच्या नसानसांतून ओसंडून वाहत होता. श्री शिवाजी महाराजांवर त्यांची आढळ निष्ठा होती. इ.स.१६७९ चे सुमारास महाराजांनी सागरी शत्रूंना थोपविण्यासाठी मुंबई बंदराच्या तोंडाशी असणाऱ्या खांदेरी-उंदेरी बंदरावर किल्ला बांधण्याचा ठरविला. त्यादृष्टीने राजाच्या वेगाने हालचालीही सुरु झाल्या .मुंबई बेटावर नजर ठेवून सागरी शत्रूंच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची राजांची या मागची योजना होती. श्री शिवाजी महाराजांच्या या हालचालीने इंग्रज प्रचंड धास्तावले आणी त्यांचा हा हेतू तडीस जाऊ नये म्हणून इंग्रजांनी खांदेरी-उन्देरीवर आपला हक्क दाखवीत महाराजांशी उघड उघड युद्ध पुकारले.कॅप्टन विलियम मिन्चीन,रिचर्ड केग्वीन,जॉन ब्रान्डबरी,फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रींगेटेस त्यांनी पाठवल्या होत्या
गेप नावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर कशातरी काही तोफा बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या हा छोट्याश्या आरमाराचा आपण सहजासहजी पराभव करू, आशा गुर्मीत ते होते महाराजांनी देखील इंग्रजांच्या या आव्हानास तोंड देण्याचा निर्धार केला . मायनाक भंडारींना रवाना केले. मायनाक भंडारींनी अतिशय पराक्रमाने आणी चिवटपणाने प्रखर संघर्ष मांडीत इंग्रजांचा हा मनसुबा हाणून पाडला .इंग्रज हाट चोळीत बसले .मायनाक भंडारींची चांगलीच दहशत इंग्रजी काळजात निर्माण झाली याच मायनाक भंडारींना महाराजांनी हर्णे गावाजवळील सुवर्णदुर्ग जिंकण्याची मोहीम फर्मावली सुवर्णदुर्गाच्या चारही अंगाला खवळलेला विशाल समुद्र होता.
महाराजांच्या आज्ञेवरून मायनाक भंडारी फौजेसह सुवर्णदुर्ग वर तुटून पडले . त्यावेळी त्यांचा पुतण्या देखील त्यांच्या समवेत होता .समुद्राच्या अंगाखांद्यावर धुमश्चक्री उसळली यामध्ये भांडारींचा पुतण्या धारातीर्थी पडला.मात्र मायनाक भंडारींनी सुवर्णदुर्ग अखेर स्वराज्यात दाखल केला
असे हे मायनाक भंडारी स्वराज्याच्या इतिहासात अजरामर झाले