उत्तर पहार डरी सिवाजी न रिंदते
दूरजन दार भजी ,भजी बे समार चढी,
उत्तर पहार डरी सिवाजी न रिंदते
भूषण भनत भिन भूषण बसन सादे, भूख न पिया सन ते नाहन को निंदते
बालक अयाने बाट बिच ही बिलाने कोमे, लाने मुख कोमल अमल अरविंदते
धृगजल कज्जल कलित बढ्यो कढ्यो मानो, दूजासो तो तरनी तनूजा कुलिनते
-कविराज भूषण
भूषण भनत भिन भूषण बसन सादे, भूख न पिया सन ते नाहन को निंदते
बालक अयाने बाट बिच ही बिलाने कोमे, लाने मुख कोमल अमल अरविंदते
धृगजल कज्जल कलित बढ्यो कढ्यो मानो, दूजासो तो तरनी तनूजा कुलिनते
-कविराज भूषण
अर्थ :
त्या नरवीर शिवाजीच्या भीतीने शत्रु स्त्रिया आपली आभूषण टाकुन उपाशी तापशी नवर्यांच्या निंदा करीत अनिवार पाने उत्तरे कडील पहाडांवर , पर्वतांवर चढू लागल्या आहेत , अदन्यान बालकान प्रमाने निर्मल कमला प्रमाने असलेली कोमल मुख त्यांची कोमेजुन गेली आहेत , मूल तर वाट चुकून भलती कडेच निघून गेली आहेत ,त्यामुले त्यांच्या मातांच्या काजळ घातलेल्या डोळ्यातून अश्रूंचा जो प्रवाह सुरु जाला आहे, तो कालिंद पर्वता पासून निघालेल्या यमुनेचा दूसरा ओघ आहे की काय अस वाटायला लागल आहे .
चक्रवर्ती चकता चतुरंगिनी
चक्रवर्ती चकता चतुरंगिनी चारिऊ चापि लई दिसिचक्का
भूप दुरीन दुरे भनि भूषन एक अनेकन बारिधि नक्का
औरंगसाहिको साहि के नन्द लर्यो शिवसाहि बजाय कै डंका
सिंह की सिंह चपेट सहै गजराज सहै गजराज का धक्का
-कविराज भूषण
-कविराज भूषण
अर्थ :
चक्रवर्ती चुगताई घराण्याचा वंशज औरंगजेबाने आपल्या चतुरंगदलाने चारी दिशांना आपला अंमल बसविला. कित्येक राजे दरी खोर्यात लपून बसले. काही समुद्रपार झाले. पण अशा औरन्गशाहाविरुद्ध शाहजीनंदन छत्रपति शिवाजी महाराज डंके वाजवून लढला. सिंहाच्या पंजाचा फटकारा सिंहच सहन करू शकतो आणि हत्तीचा धक्का दुसरा हत्तीच !
कवी भूषणाने किल्ले रायगडाचे केलेले वर्णन
पम्पा मानसर आदि तलाब लागे
जेहिके परन मैं अकथ युग गथ के
भूषन यों साज्यो रायगढ सिवराज रहे
देव चक चाहि कै बनाए राजपथ के
बिन अवलम्ब कलिकानी आसमान मै है
होत बिसराम जहाँ इंदु औ उद्य के
महत उतंग मनि जोतिन के संग आनि
कैयो रंगचक हा गहत रविस्थ के
-कविराज भूषण
-कविराज भूषण
अर्थ :
जेथे निवास करि रायगढी नृपाळ
पंपासरोवर समान सरें विशाल
तेथील राजपथ सुन्दर पाहुनी ते
आश्चर्य होई हृदयी सुरदानवांते
आधारहीन रविचन्द्र नभी फिरुनी
घेतात विश्राम इथें रथ थाम्बवूनी
येथील हर्म्यमणिमाणिक दीप्तियोगे
रक्तप्रभा वरिति ती रविची अथांगे
जेथे निवास करि रायगढी नृपाळ
पंपासरोवर समान सरें विशाल
तेथील राजपथ सुन्दर पाहुनी ते
आश्चर्य होई हृदयी सुरदानवांते
आधारहीन रविचन्द्र नभी फिरुनी
घेतात विश्राम इथें रथ थाम्बवूनी
येथील हर्म्यमणिमाणिक दीप्तियोगे
रक्तप्रभा वरिति ती रविची अथांगे
पातशहा हिन्दुपति,पात शहा सेवाने
मन कवी भूषण को, सिव की भगति जिचो ,सिव की भगति जिचो ,साधू जन सेवाने !!
साधू जन जीते या कठिन कलि काल,कलि काल महाबीर महाराज महि मेवाने !!
जगत में जीते महाबीर महाराजनते, महाराज बावनहु पातशहा लेवाने !! पातशहा बावनु दिली के पातशहा जीती,पातशहा हिन्दुपति,पात शहा सेवाने !!
-कविराज भूषण
जगत में जीते महाबीर महाराजनते, महाराज बावनहु पातशहा लेवाने !! पातशहा बावनु दिली के पातशहा जीती,पातशहा हिन्दुपति,पात शहा सेवाने !!
-कविराज भूषण
अर्थ :
" शिवाजी " महाराजांना भूषणाने इथे हिन्दूपति म्हटले आहे,भूषण म्हणतोय कवीच्या मनात शिव-भक्तिने ,शिव भक्तिस साधू -जनांच्या सेवेने, साधू जनास कलि कालने,कलि कालास शुर आणि कीर्तिवान राजानी, आणि शुर आणि कीर्तिवान राजाना बावन्न बादशहास जिंकनार्या औरंगजेबाने ,आणि त्या बावन्न बादशहंच्या बादशहास म्हणजे दिल्ली पति औरंगजेबास हिन्दू पति " शिवाजीने " जिंकले..
महादानी सिवाजी खुमनया जहानपर
महादानी सिवाजी खुमनया जहानपर,
दान के प्रमाण तेरे, अति गनइतू हे !!
रजत की हौस किये,हेम पाई येतो जाई, हयन की हौस किये,हाथी पाई येतो हे !!
-कविराज भूषण
रजत की हौस किये,हेम पाई येतो जाई, हयन की हौस किये,हाथी पाई येतो हे !!
-कविराज भूषण
अर्थ :
ह्या जगात हा आयुष्य मान "शिवाजी" महान दाता असून,त्याच्या दानाचे प्रमाण विलक्षण आहे ,इथे चांदीची इच्छा ठेवून आलो की सोनच देतो तो,आणि घोड्याची इच्छा ठेवून आलो की तो हत्तीच दान करतो.
इते गुण एक सिवा सरजामे
सुंदरता,गुरुता,प्रभुता,भनी भूषण होत हे आदरजामे ,
सज्जनता ओ दयालुता,दीनता,कोमलता झलके परजामे !!
दान कृपान हु को करी, बो करी बो अभय दानन की बरजामे, साहन सोरन टेक विवेक, इते गुण एक सिवा सरजामे !!
-कविराज भूषण
दान कृपान हु को करी, बो करी बो अभय दानन की बरजामे, साहन सोरन टेक विवेक, इते गुण एक सिवा सरजामे !!
-कविराज भूषण
अर्थ :
सौन्दर्य,गुरुत्व,आणि प्रभुत्व ,हे गुण ह्या "शिवाजी" राजाच्या ठिकाणी वसत असल्याने आदराला पात्र झाले आहेत,तसाच ह्याच्या ठीकानी प्रजे विषयी सौजन्य,दयाळुता आणि कोमलता दिसून येते,शत्रुणा तलवारीचे दान,आणि दिनांना अभयदान देण्याचे सामर्थ्य आहे,बादशहाशी पण लावून युद्ध करण,आणि कोणत्तही काम विचार पूर्वक करण,हे इतके गुण एक सर्जा शिवाजी च्या ठीकानी आहेत. श्री शिवराज बघारी
छाय रही जित ही तित ही,अति ही छबी छेरदी रंग करारी,
भूषण सुध्ह सुधान के सौधनि, सौधतसी धरी ओप उचारी !!
युतम तोमही चाबी के चंद, चहूदसी चंदनी चारू पसारी जो अफजल्ल ही मारी महिपर, कीरति श्री शिवराज बघारी !!
-कविराज भूषण
युतम तोमही चाबी के चंद, चहूदसी चंदनी चारू पसारी जो अफजल्ल ही मारी महिपर, कीरति श्री शिवराज बघारी !!
-कविराज भूषण
अर्थ :
ज्याप्रमाणे सागरात जीकड़ दृष्टि फेकवि तिकड़ शुभ्र छवि पसरलेली दिसते, किंवा चन्द्रांन अन्ध्कारस ग्रासून शुभ्र चांदन पसराव आणि तय प्रकाशत प्रासदंची जशी शोभा दिसावी त्याप्रमाणे " शिवाजीने " अफजल खानला मारून पृथ्वी वर आपली उज्वल कीर्ति पसरली.
ज्यापर साही तने सिवराज
ज्यापर साही तने सिवराज,सुरेस की ऐस की सभा सुभ साजे,
यो कवी भूषण जम्पत हे लकी, सम्पति को अलका पति लाजे !!
जा मदि तिन हु लोक् को दिपती , एसो बडो गड राज बिराजे, वारी पताल सी माची माहि , अमरावती की छबी ऊपर छाजे !!
-कविराज भूषण
जा मदि तिन हु लोक् को दिपती , एसो बडो गड राज बिराजे, वारी पताल सी माची माहि , अमरावती की छबी ऊपर छाजे !!
-कविराज भूषण
अर्थ :
या रायगड किल्ल्यावर शाहजी पुत्र " शिवाजी "ची सभा इंद्र सभे प्रमाने शोभते,भूषण म्हणतोय इथली सम्पति पाहून प्रत्यक्ष कुबेर देखिल लाजू लागला,हा कील्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की या तिनी लोकिच वैभव साठाव लेला आहे,किल्ल्या खालील भूभाग जलमय पाताळा प्रमाने , मची पृथ्वी प्रमाने,आणि वरील प्रदेश इन्द्र पूरी प्रमाने शोभतायत.
किबले की ठोर बाप बादशाह सांहजहा
किबले की ठोर बाप बादशाह सांहजहा, ताको कैद कियो मानो मक्के आग लायी हे,
बडो भाई दारा को पकरीके मारी दारियो, मेह रहू नाही माको बडो सगा भाई हे !!
बंधू तो मुरादबक्ष बादी चुक करिबे को, बिच ले कुरान खुदा की कसम खाई हे, भूषण सुकवी कहे सुनो नवरंग जेब , ये तो काम किन्ने तेयु पादशाही पाई हे !!
अर्थ :
अवरंगजेब तुम्ही तीर्थ समान पूज्य असलेल्या आपल्या बापास शाहजहाँ बद्शाहस कैद केल ,हे तुमच कृत्य मक्केला आग लावण्या सारखे आहे,तुमचा वडिल बंधू दारा त्याला ही पकडून तुम्ही कैदेत घातल,यावरून तुमच्या मनात दया नावाचा प्रकार ही नाही हे कळुन येत, दूसरा भाऊ मुरादबक्ष याच्याशी हातात कुरान घेउन खुदाची खोटी शपथ घेतली ,ही अशी कृत्य करून तर तुम्हाला ही पादशाही मिळाली आहे..
"हा छंद औरंगजेबा समोर त्याच्या दरबारात भूषनाणे त्याच्या समोर म्हटला " ही आख्यायिका आहे ...
बंधू तो मुरादबक्ष बादी चुक करिबे को, बिच ले कुरान खुदा की कसम खाई हे, भूषण सुकवी कहे सुनो नवरंग जेब , ये तो काम किन्ने तेयु पादशाही पाई हे !!
-कविराज भूषण
"हा छंद औरंगजेबा समोर त्याच्या दरबारात भूषनाणे त्याच्या समोर म्हटला " ही आख्यायिका आहे ...
भिकारी हमें कीजिये ,महाराज शिवराज के...
बेपारी जहाज के, न राजा भारी राज के,
भिकारी हमें कीजिये ,महाराज शिवराज के !!
-कविराज भूषण
कविराज भूषण कोण होते ?
कवि भूषण यांचा जन्म १६१६ साली तिकमपूर नावाचे कानपूर जिल्ह्यात एक गाव आहे, तेथे झाला. यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते.
यांना ४ मुले. १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली.
थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले.
भूषण हे बरेच दिवस आपले थोरले बंधू चिंतामणी यांच्या जवळ राहात असत. पण एक दिवस भावजयीच्या काही दुरूत्तरांमुळे रागावून ते घराबाहेर पडले व त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या विद्वत्तेच्या व कवित्वाच्या जोरावर स्वतःचा उत्कर्ष करून घेतला.
चित्रकूट राजा ऋदयराम सोळंकी यांच्याकडे कविराज गेले असताना, राजाच्या गर्वीष्ठ दानदर्पास झुगारून त्यांनी स्वतःच्या कवितेचे व अस्मितेचे जतन आणि संरक्षण केले. शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून प्रभावित झालेले कविराज उत्तरेहून दक्षिणेकडील सह्याद्रीचे काटे सराटे तुडवीत येऊन महाराजांना भेटले. त्यांनी शिवराजभूषण नावाचा एक अलंकार शास्त्रावरील ग्रंथ लिहिलेला असून त्यात शिवरायांच्या निरनिराळ्या पराक्रमांचे काव्यमय वर्णन अलंकारीक पद्धतीने अविश्कारीत केलेले आहे.
शिवाबावनी हा ग्रंथ त्याच पुस्तकातील एक भाग आहे असे समजतात. हिंदी साहित्यात चंद्रकृत पृथ्वीराज रासा या ग्रंथाच्या तोडीची मान्यता शिवराजभूषणास आहे.
भूषण फारच वृद्ध होऊन वयाच्या १०२ व्या वर्षी वारले. शिवरायांनंतर ते छत्रसाल बुंदेला यांना जावून भेटले होते.
भूषण फारच वृद्ध होऊन वयाच्या १०२ व्या वर्षी वारले. शिवरायांनंतर ते छत्रसाल बुंदेला यांना जावून भेटले होते.
साहि तनै सरजा कि कीरती सों...
साहि तनै सरजा कि कीरती सों ।
चारों और चाँदनी वितान छिति छोर छाइयतु है ।
भूषन भनत ऐसो भूप भौंसिला है ।
जाको द्वार भिच्छुकन सो सदाई भाइयतु है ।
माहादानी सिवाजी खुमान या जहान ।
पर दान के प्रमान जाके यों गनाइयतु है ।
रजत की हौस किए हेम पाइयतु जासो ।
हयन की हौस किए हाथी पाइयतु है ॥
-कविराज भूषण
अर्थ :
शहाजी पुत्र शिवरायांच्या कीर्तिरूप चांदणीचा मंडप पृथ्वीच्या चहूंकडील टोकापर्यंत पसरला आहे. भूषण म्हणतो, हे भोसलेराज असे आहेत की, भिक्षुकांना
नेहमी त्यांच्या द्वाराशी पडून रहावेसे वाटते. या भूतलावर शिवाजी महाराज
महान महान दाता असून त्यांच्या दानाचे प्रमाण यावरूनही समजून येते ; की रूप्याची इच्छा केली असता सोने मिळते व घोड्याची इच्छा केली असता महाराजांकडून हत्ती मिळतो.
या छंदावरून शिवाजी महाराजांनी दानाप्रीत्यर्थ कविराज भूषणास हत्ती भेट दिलेला असावा असा तर्क करावयास जागा आहे.
नरसिंह सिवा है...
एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।
एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।
भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।
एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥
-कविराज भूषण
अर्थ :
यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.
हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात.
भुषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे.
कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास सिंह म्हणतात तर कोणी प्रत्यक्ष नृसिंह भगवानच समजतात.
कारण ज्याप्रमाने नरसिंहाने हिरण्यकशपुचे पोट फाडले तद्वातच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी काढली.
सिवा नरेस भ्रकुटी चढाई है...
प्रेतिनी पिसाच रु निसाचर निसाचरि हू, मिलि मिलि आपुसमे गावत बधाई है ।
भैरों भूत प्रेत भूरी भूधर भयंकर से, जुत्थ जुत्थ जोगिनी जमाती जुरि आई है ।
किलकि किलकि कै कुतूहल करति काली, डिमडिम डमरू दिगंबर बजाई हैं ।
सिवा पूंछै सिव सों "समाजु आजु कहॉ चली", काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ॥
-कविराज भूषण
अर्थ : (या छंदात भूषण कवीने काल्पनिक शिव - पार्वती संवाद वर्णिलेला आहे)
प्रेते, पिशाच्चे, राक्षस, राक्षसी जमून आपापसात आनंदाने गात आहेत. पर्वताप्रमाणे धिप्पाड शरीरे धारण करणारे भैरव, तसेच भूते, प्रेते यांच्या झुंडीच्या झुंडी जमू लागलेल्या आहेत, कालीदेवता किल किल शब्द करून जमलेल्या समाजाचे कौतुक करीत आहे, आणि महादेव आनंदाने डमरू वाजवत आहे. हा शिवगणाचा आनंद पाहून पार्वतीने महादेवास विचारले,
" महाराजा, आज आपली मंडळी कुठे निघाली आहेत ?"
महादेव म्हणाले,
" आज, शिवराज कोणा शत्रुवर कृद्ध झालेले आहेत."
शाइस्तेखान..
दच्छिन को दाबि करि बैठो है ।
सईस्तखान पूना मॉंहि दूना करि जोर करवार को ॥
हिन्दुवान खम्भ गढपति दलथम्भ ।
भनि भूषन भरैया कियो सुजस अपार को ॥
मनसबदार चौकीदारन गंजाय महलनमें ।
मचाय महाभारत के भार को ॥
तो सो को सिवाजी जे हि दो सौ आदमी सों ।
जीत्यो जंग सरदार सौ हजार असवार को ॥
-कविराज भूषण
अर्थ :
शाइस्तेखान
दक्षिण हस्तगत करून पुण्यात ठाणे देऊन बसला. या वेळी हिंदूंचा आधारस्तंभ व
किल्लेदारांच्या एका सेनानायकाच्या तरवारीस जोर चढला अन् त्याने अपार
सुकिर्ती मिळवली. (ती अशी मिळवली की)
मोठमोठ्या मनसबदारास व चौकिदारास जखमी करून त्याने महालांत शिरून महाभारत माजवण्यास (युद्ध करण्यास) सुरुवात केली !
भूषण म्हणतो, कि हे शिवराया, तुझ्या शिवाय दुसरा पराक्रमी कोण आहे ? ज्याने फक्त दोनशे माणसांनिशी लाख स्वार असणार्या सरदाराबरोबरचे युद्ध जिंकले.
जै जयंति जै आदि सकति
जै जयंति जै आदि सकति जै कालि कपर्दिनी ।
जै मधुकैटभ - छलनि देवि जै महिषविमर्दिनि ।
जै चमुंड जै चंड मुंड भंडासूर खंडिनि ।
जै सुरक्त जै रक्तबीज बिड्डाल - विहंडिनि ।
जै जै निसुंभ सुंभद्दलनि भनि भूषन जै जै भननि ।
सरजा समत्थ सिवराज कहॅं देहि बिजय जै जग-जननि ॥
-कविराज भूषण
अर्थ :
हे
आदिशक्ति ! हे कालिके ! हे कपर्दिनि (गौरी) ! हे मधुकैटभ महिषासूरमर्दिनि
देवी ! हे चामुंड देवी ! हे भंडासूर्खंडिनी ! हे बिडाल विध्वंसिनी ! हे
शुंभ-निशुंभ - निर्दालिनी देवी ! तुझा जयजयकार असो ! भूषण म्हणतो हे
जगज्जननी ! सिंहासमान शूर अशा शिवरायास विजय देत जा...
कुंद कहा, पयवृंद कहा
कुंद कहा, पयवृंद कहा, अरूचंद कहा सरजा जस आगे
भूषण भानु कृसानु कहाSब खुमन प्रताप महीतल पागे
राम कहा, द्विजराम कहा, बलराम कहा रन मै अनुरागे
बाज कहा मृगराज कहा अतिसाहस मे सिवराजके आगे
-कविराज भूषण
अर्थ : कुंद, दुध व चंद्र यांची शुभ्रता शिवरायांच्या यशासमोर काय आहे ? (१),
पृथ्वीवर पसरलेल्या शिवरायांच्या प्रखर प्रतापापुढे सुर्य व अग्नी यांच्या तेजाचा काय पाड ? (२),समरप्रियतेमध्ये दाशरथी राम, परशूराम व बलराम हे देखिल शिवरायांच्या मागेच होत.(३)
आणि धाडस पाहिले असता बाज (बहिरी ससाणा - पक्ष्यांवर झेप घेणारा) व सिंह हे शिवरायांच्यापुढे तुच्छ होत. (४)
काल तुरकानको !! काल तुरकानको !!
पैज प्रतिपाल भर भुमीको हमाल,
चहु चक्कको अमाल भयो दंडक जहानको !!
साहीन की साल भयो, ज्वार को जवाल भयो,
हर को कृपाल भयो, हर के विधानको !!
वीर रस ख्याल सिवराज भू-अपाल तेरो,
हाथके बिसाल भयो भूषण बखानको !!
तेज तरवार भयो, दख्खनकी ढाल भयो,
हिंदुकी दिवार भयो, काल तुरकानको !!
काल तुरकानको !! काल तुरकानको !!
काल तुरकानको !! काल तुरकानको !!
-कविराज भूषण
अर्थ :
शिवराज भूपाल - प्रतिज्ञा पूर्णत्वास पोचवणारा, भूमीभार शिरावर घेणारा, चहूं दिशांच्या राज्यांवर अम्मल गाजवणारा, जगतास शासन करणारा, तसेच बादशहास शल्ल्याप्रमाणे जाचणारा, (प्रजेची)
पीडा हरण करणारा आणि नरमुण्डमाला अर्पण करण्याच्या विधीने महादेवावरही
कृपा करणारा असा झाला. भूषण म्हणतो तूझी तरवार दख्खनला ढालीप्रमाणे व
हिंदूंना भिंतीप्रमाणे रक्षण करणारी झाली असून तुर्कांन्ना (ईस्लामला)
मात्र प्रत्यक्ष काळ झाली आहे. वीररस प्रिय अशा शिवरायाच्या विशाल भुजांचे
(ज्या स्वत: शक्ती संपन्न असून इतरांनाही शक्ती देणार्या आहेत) कोण वर्णन
करू शकेल ?
म्लेंच्छ चतुरंग पर सिवराज देखीये
सक्र जिमि सैल पर ।
अर्क तम-फैल पर ।
बिघन की रैल पर ।
लंबोदर देखीये ॥
राम दसकंध पर ।
भीम जरासंध पर ।
भूषण ज्यो सिंधु पर ।
कुंभज विसेखिये ॥
हर ज्यो अनंग पर ।
गरुड ज्यो भूज़ंग पर ।
कौरवके अंग पर ।
पारथ ज्यो पेखिये ॥
बाज ज्यो विहंग पर ।
सिंह ज्यो मतंग पर ।
म्लेंच्छ चतुरंग पर ।
सिवराज देखीये ॥
सिवराज देखीये ॥ सिवराज देखीये ॥
सिवराज देखीये ॥ सिवराज देखीये ॥
-कविराज भूषण
अर्थ :
ज्या प्रमाणे ईंद्र पर्वताचा, सुर्य अंध:काराचा व विग्नहर्ता गणराज विघ्नसमुदायाचा नाश करतो, (१)
किंवा ज्या प्रमाणे रामाने रावणाचा व भीमाने जरासंधाचा नाश केला, अगस्त्ति ऋषींनी समुद्राचा घोट घेतला, (२)
महादेवाने मदनास जाळून भस्म केले, अर्जुनाने कौरवांचा नि:पात केला, (३)
किंवा सर्प गरुडास, पक्षी बहिरी ससाण्यास व हत्ती सिंहास बघुन भयभीत होतात, तद्वत इस्लामी चतुरंग सैन्य शिवरायांच्या पराक्रमासमोर भयभीत होते. (४)
गर सिवाजी न होते तो
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो |
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं ||
राखी रजपुती , रजधानी राखी राजन की |
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं ||
भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की |
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं ||
साही के सपूत , सिवराज समशेर तेरी |
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं ||
वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत |
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं ||
हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की |
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं ||
मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह |
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं ||
राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज |
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं ||
देवल गिराविते , फिराविते निसान अली |
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ||
गौर गणपती आप , औरनको देत ताप |
आपनी ही बार सब , मारी गये दबकी ||
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत |
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की ||
कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||
अर्थ :
हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति
व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व
राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर
धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच
राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला
श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या
दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात
हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे
सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर
रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या
भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना
आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर
बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले
आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे.
सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी
मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती
आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून
ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती.
No comments:
Post a Comment