Saturday, June 23, 2012

आद्मापत्र

आद्मापत्र

आद्मापत्र - दि.0५ ऑक्टोबर १६८७ रोजी संभाजीराजे सर्जेराव जेध्यांना कड़क शब्दात आद्मापत्र लिहितात - " स्वामीकृपा होउन आपले वतन देशमुखी आपले स्वाधीन करतील आणि अभयपत्र सादर होइल तरी आपण एकनिष्ठ होउन सेवा करीन म्हणुन तरी तुमचा मुद्दा मामलेहवालदार (संताजी निंबाळकर) यांनी स्वामीचे सेवेसी हुजुर लिहिला त्यावरून कळो आला। त्यावरून हे आद्मापत्र तुम्हास लिहिले आहे। तरी आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केली, की वतनदार होउन इमाने इतबारे वर्तावे। ते गोष्ट न करीता स्वामींचे (शिवाजी महाराज ) अन्न बहुत दिवस भक्षिले त्याचे सार्थक केलेत की, स्वामीच्या पायासी दुर्बुद्धि धरोन दोन दिवसांचे मुघलत्यांच्याकडे जाऊन राहिले। तुमचा भाऊ शिवाजी जेधे गनिमाकडे गेला ते तुम्हास बारे पाहेना, ऐसे होते तरी तुम्ही येती। ते केले नाहीतरी बरच गोष्ट जाली या उपरही गनिमाकडे राहणेच असेल तरी सुखेच राहणे। तुमचा हिसाब तो काय? ए क्षणी स्वामी आद्मा करितात तरी गनिमादेखिल तुम्हास कापून काढवितच आहोत हे बरे समजणे। दूसरी गोष्ट की तिथे राहणेच नाही। एकनिष्ठेने स्वामिंच्या पायाजवळी वर्तावे यैसे असले तरी तुम्ही परभारे मुद्दे सांगुन गडकिलीया कड़े शाबीते काय म्हणुन करीता हे गोष्ट स्वमीस मानत नाही। स्वामी तुमचा मुद्दा मनास आणून आद्मा करायची ते करतील। तरी यैसी गोष्ट करावया प्रयोजन नाही। उजरातीखेरीज दुसरीकडे राबता न करणे। जे वर्त्तमान लिहिणे ते स्वमीस लिहित जाणे। तुमचे ठायी एकनिष्ठाताच आहे ऐसे स्वामीस कळलियावर जे आद्मा करणे ते करून आद्मापत्र सादर होईल तेणे प्रमाणे वर्तणुक करणे। "

No comments:

Post a Comment

Website Security Test