जावळी प्रास्ताविक
सन १६४६ मधे शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरे
घराण्यातील दत्तकपुत्राला अप्रत्यक्षपणे पाठींबा दिला होता. त्यामुळे नवीन
चंद्रराव त्याच्याशी सलोख्याने वागेल अशी अपेक्षा करणे चुकीचे नव्हते. सन
१६४९ च्या काही दिवस आधी चंद्ररावचा चुलत भाऊ हणमंतरावने जोर खोरे घेतले.
हा भाग अफजलखानकडे असलेल्या वाई परगण्यातला होता.
हणमंतरावाकडून जोर
खोरे घेण्यासाठी अफजलखानने केलेली चाल पुढे सरकली नाही. ह्यानंतर मोरे
घराण्याच्या हलचालींमुळे शिवरायांच्या मुलुखातील प्रजेला उपसर्ग होऊ लागला.
मोरे त्याचे शेजारीच असल्याने त्याचा काहीतरी बंदोबस्त करणे भाग होते.
शिवरायांनी
चंद्ररावला लिहीले होते की त्याने राजे ही पदवी वापरु नये व शिवरायांशि
इमान राखावा. हा उल्लेख मोरे बखरीमधे सापडतो. ह्यावर चंद्ररावाच्या
उत्तराने शिवरायानबरोबरचे संबंध धोक्यात आणले. त्यामुळे हे स्पष्ट होते की
शिवरायांचे जावळीवरचे आक्रमण मुख्यतः राजकारणासाठीच होते.
सभासद बखरीत शिवरायांच्या जावळी युद्धाचे कारण स्पष्ट होते ...
चंद्रराव मोरे यांस मारल्याविरहित राज्य साधत नाही ।
सभासद बखर
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७६९-७७३
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ १०४४-१०६६
जावळीवर आक्रमण
शिवरायांकडे दहा हजारांचे सैन्य होते असे म्हटले आहे पण
बहुदा ही अतिशयोक्ती असावी. जावळीवर एकाच वेळी दोन बाजूंनी आक्रमण करायची
त्याची योजना होती. त्याने रडतोंडीच्या घाटाकडे एक टोळी पाठवली. तिला
चंद्ररावाच्या लोकांनी अडविले. दुसरी मोठी टोळी घेऊन राजे स्वतः
महाबळेश्वराच्या पठारावरुन निसाणी घाटाने जावळीकडे गेले .
१५ जानेवारी
१६५६ ला जावळी शिवरायांकडे आली व ३० मार्च पर्यंत राजे तिथे राहिले .
चंद्रराव मोरे जावळीतून निसटला व रायरीला, म्हणजे रायगडला गेला. जावळीमधे
काही प्रतिकार झाला असावा ज्यामुळे शिवरायांना तिथे ३० मार्चपर्यंत राहावे
लागले. राजे तिथे असताना त्याच्या लोकांनी रायरीलाही वेढा घातला असावा.
जावळी
सोडल्यावर ६ एप्रिल १६५६ ला शिवाजी राजे रायरीला पोहोचले . त्यानंतर लगेच
चंद्ररावाने हत्यार टाकले व कृष्णाजी व बाजी ह्या त्याच्या दोन मुलांसह
त्याला बंदी बनविण्यात आले. बंदिवासातून चंद्ररावाने पळण्याचा प्रयत्न केला
व त्याने घोरपडेला लिहीलेले पत्र शिवरायांनी अडविले. चंद्रराव व
कृष्णाजीचा शिरच्छेद करण्यात आला व बहुदा त्याचा दुसरा मुलगा बाजी निसटला.
हा उल्लेख मिरझा राजे जयसिंहने औरंगजेबला १६६५ मधे लिहीलेल्या पत्रात
सापडतो.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७६९-७७३
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ १०४४-१०६६
जावळी मोहिमेचा आढावा
शिवरायांनी जावळी घेण्याचा अतिशय धोरणात्मक
निर्णय घेतल्याचे दिसून येते. जावळी घेतल्यावर त्यांना कोकणातली थेट वाट
प्राप्त झाली. त्याच्या छोट्या सैन्याला व वेगवान हलचालींना अनुकूल आणि
आदिलशाही व मुघलांसारख्या भल्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना प्रतिकूल असा
मोठा प्रदेश त्यांना मिळाला. त्यांनी लगेच भोरप्या डोंगरावर प्रतापगड
बांधायला घेतला. फक्त तीन वर्षांनी त्याच ठिकाणी राजे अफजलवध करणार होते .
जावळी
जिंकल्यावर लगेच प्रभावळीच्या सूर्यराव सुर्व्यांनी कोकणात शिवरायांची
सत्ता मान्य केली. ह्यामुळे शिवरायांचा मुलुख आणखी वाढला. जंजीरेकर
सिद्दीही आता शिवरायांचा शेजारी झाला. शिवरायांनी रायरीही जिंकला होता
त्याचाच पुढे रायगड झाला, मराठा साम्राज्याची राजधानी. ह्या एका चालीने
राजांना पुणे व आसपासच्या परिसराहून कितीतरी मोठ्या प्रदेशाचा मानकरी केले.
ह्या चालीनंतर राजांना त्याच्या शेजाऱ्यांकडूनही मान मिळायला लागला.
जावळीतून
रायरी व प्रतापगडाबरोबर त्यांना वासोटा किल्लाही मिळाला जो आजही अतिशय दाट
व भयंकर अरण्यात लपलेला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिवरायांना प्रथमच
मोठा समुद्रकिनारा लाभला. त्यामुळे आरमारावर लक्ष देणे त्याला अनिवार्य
होते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जावळी जिंकणे हे त्याच्यासाठी फार मोठे पाऊल
होते. राजाच्या छोट्या जाहगीरीला ह्यामुळे छोट्या राज्याचे स्वरुप मिळाले.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७६९-७७३
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ १०४४-१०६६
जावळी मोहिमेचे महत्व
सन १६५६ मधे मुघलांनी कुतुबशाहीवर आक्रमण केले
होते. ह्या वादळाचे लोट त्यांच्या प्रदेशात येऊ नयेत म्हणून आदिलशाहीनेही
त्यांचे सैन्य कुतुबशाही सीमेवर ठेवले होते. हा भाग जावळीपासून कित्येक दूर
होता. त्यामुळे मुघल किंवा आदिलशाहीला जावळीतल्या घडामोडींकडे लक्ष
द्यायला अजिबात वेळ नव्हता. तसेच शिवरायांना मोरे व आदिलशाहीमधे उडालेल्या
खटक्यांची माहिती होती. त्यामुळे तशी वेळ आली असती तर जावळीवरचे त्यांचे
आक्रमण आदिलशाहीसाठीच केले होते असे कारणही राजे पुढे करु शकत होते .
शिवरायांनी
ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन जावळीवर आक्रमण केले असे ठामपणे सांगता येत
नाही पण निश्चितपणे ती वेळ सुयोग्य होती. जावळीवरचे आक्रमण सुरु
करण्यापूर्वी शिवरायांनी संभाजी कावजीला हणमंतरावाकडे असलेल्या जोर
खोऱ्यावर चालून जायला सांगितले होते. त्यामुळे तिथुन शिवरायांवर वार होणार
नाही ह्याची त्यांनी आधीच काळजी घेतली होती. ह्यातून अचूक योजना करण्याचे व
ती पार पाडण्याचे शिवरायांचे कौशल्य आपल्याला दिसते.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७६९-७७३
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ १०४४-१०६६
शिवाजी राजे जावळी जिंकतात
सन १६५६ मधे जावळी जिंकून घेणे हा
शिवरायांसाठी अतिशय महत्वाचा टप्पा होता. त्यामुळे कोकणातला त्यांचा संचार
मुक्त झाला तसेच जंजीऱ्याचा सिद्दी आता त्यांचा शेजारी झाला. त्याच्या
शत्रुंना भयभीत करेल अशी मोक्याची जागा जावळीने त्यांना दिली. तिथले दाट
अरण्य व निर्मनुष्य विस्तृत जंगल सर्वपरिचित होते. प्रतापगड व रायगडासारखे
भक्कम किल्लेही त्याला जावळीतूनच मिळाले. त्याबरोबर चंद्रगड, कमळगडासारखे
इतर काही गडही त्याच्या वाट्याला आले.