Friday, February 26, 2016

शिवकालीन महाराष्ट्र-महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार





                                                   कोळी चौथरा, शिवनेरी
शिवनेरीच्या इतिहासात महादेव कोळी समाजाच्या क्रांतिकारी पर्वाची साक्ष देणारा हा चौथरा इतिहासकारांच्या लेखणीतून दुर्लक्षितच राहिला आहे.

शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले.मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तमाम लोक पकडून आणून कापले गेले. नाईकास निर्वंश केले आणि सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरे कापली गेली. त्या शिरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या नेत्याचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार

पुणे परिसरातील शिवरायांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.
ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला. मुघलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.
शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्या मुघल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.
दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाईल.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ६९९-७११
• शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर, पृष्ठ ४३-४४
साभार :www.marathaempire.com

12 comments:

  1. Please mention the spot as Mahadev Koli cuauthara ......

    ReplyDelete
    Replies
    1. किल्ले शिवनेरी गड जुन्नर पुणे

      Delete
  2. धन्यवाद किमान आपण तरी याला महत्व दिलेत.��

    ReplyDelete
  3. If you're trying to burn fat then you certainly need to get on this brand new personalized keto diet.

    To create this service, licenced nutritionists, personal trainers, and chefs have united to produce keto meal plans that are efficient, suitable, price-efficient, and fun.

    From their first launch in 2019, 1000's of clients have already remodeled their body and health with the benefits a smart keto diet can give.

    Speaking of benefits: clicking this link, you'll discover 8 scientifically-certified ones provided by the keto diet.

    ReplyDelete
  4. सर ही घटना साधारणता कोणत्या काळातील आहे

    ReplyDelete
  5. ही घटना कोणत्या साली घडली कोणी सांगू शकेल का??

    ReplyDelete
  6. कोळी महादेव चबुतरा/ काळा चबुतरा.. हा आदिवासींच्या विरतेचे प्रतीक आहे... हा नरसंहार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माच्या अगोदर चा इतिहास आहे.. शिवनेरी किल्ला हा महादेव कोळ्यांच्या ताब्यामध्ये होता... खेमा/ खेमि रघतवान... हे शिवनेरी किल्ल्याचे सरनाईक होते.. स्वराज्याची प्रथमता आदिवासी समाजामध्ये रुजलेले होति..

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर.. शिवाजी महाराजांच्या जन्मा आधीचा हा नरसंहार आहे🙏🙏

      Delete
    2. जय आदिवासी.
      पण माझा प्रश्न असा आहे कर्क.हे जर निजामशाही १६३५-३६ ला बुडाली आणि नंतर महादेव कोळ्यांनी ताबा घेतला असेल तर मग तेव्हा तर शिवरायांचा जन्म झालेलाच होता ना? नक्की कळवा..जय शिवराय..जय आदिवासी

      Delete

Website Security Test