गोपाळभट श्रीधरभटाची महाबळेश्वर देवळात नेमणूक
महाबळेश्वर मंदिरात
दिवाबत्ती व पुजेची व्यवस्था पाहण्यासाठी शिवरायांनी गोपाळभट श्रीधरभटाला
नेमले होते. १८ फेब्रुवारी १६५३ च्या एका पत्रात हा उल्लेख सापडतो. पण नवीन
संदर्भाप्रमाणे हे पत्र बनावट आहे. श्री राजाशिवछत्रपती ह्या पुस्तकात
त्याचे पूर्ण स्पष्टीकरण सापडते. त्यातला सारांश खाली दिला आहे.
ह्या
पत्राची तारीख हिंदू कालगणनेनुसार दिली आहे. शिवरायांच्या
राज्याभिषेकाआधीची सर्व पत्रांवर हिजरी तारीख असते. त्यामुळे फक्त ह्या
एकाच पत्रावर हिंदू पंचांगाप्रमाणे तारीख येणे अवघड आहे. दुसरे म्हणजे १८
फेब्रुवारी १६५३ ला शुक्रवार होता पण पत्रात रविवार असा उल्लेख दिला आहे.
हे
पत्र बनावट असण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे महाबळेश्वरचा भाग
जावळीत येतो व १६५६ पर्यंत तो मोरे घराण्याकडे होता. म्हणजेच शिवरायांना सन
१६५३ साली ह्या भागातल्या नेमणुका करण्याचा काही अधिकारच नव्हता.
शिवरायांनी सन १६५६ मधे जावळी घेतल्यानंतरच त्यांना ह्या नेमणुका करता
आल्या असत्या.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड २, पृष्ठ ९८७-९९२
सांभार :www.marathaempire.com
No comments:
Post a Comment