Wednesday, February 10, 2016

शिवकालीन महाराष्ट्र भाग १३७



शाहजी राजांकडे सुपे परगणा होता. शाहजी राजे कर्नाटकात असल्याने त्याचा कारभार शाहजी राजाच्या मेहुण्याकडे म्हणजे, संभाजी मोहितेच्या हातात होता. शाहजी राजांची दुसरी पत्नी तुकाबाई ही संभाजीची बहीण होती. सन १६५६ मधे शिवरायांनी संभाजी मोहितेला अटक केले व सुप्याचा ताबा स्वतःकडे घेतला.
ही घटना जेधे शकावली व शिवापूर शकावलीत सापडते पण अटकेचे कारण त्यात दिले नाही. ह्या उपरांत संभाजी मोहितेचे काय झाले त्याचे काही संदर्भ अजून उपलब्ध नाहीत.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७७३-७७७

No comments:

Post a Comment

Website Security Test