ऑगस्ट
|
६ ऑगस्ट १६५९
ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील प्रमुख गवर्नरला 'मराठ्यांच्या
आरमाराबद्दल सावधान' असण्याबद्दलचे पत्र लिहिले.
शिवरायांनी १६५७ पासून कल्याण - भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा
उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क
होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले.
सदर पत्राचा मराठी अनुवाद-
"शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते
चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे.
त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली
आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर
येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले
आहेत."
८ ऑगस्ट १६४८ पुरंदरावर स्वराज्याची पहिली लढाई.
पुरंदर खळत-बैलसर येथे स्वराज्याची पाहिली मोठी लढाई. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या एकुण ६०००च्या फौजेचा शिवाजी राजांकडून सपशेल पराभव.
फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द शिवाजीराजे चालून गेले. ह्या
लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. ही लढाई खळत-बैलसर येथे झाली. तर
पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी लढताना 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले.
८ ऑगस्ट १६७६
शिवाजी महाराजांनी सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना सज्जनगडावर आदरपूर्वक आणविले व त्यांच्या कायमनिवासाची उत्तम व्यवस्था केली.
शिवाजी महाराजांनी सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना सज्जनगडावर आदरपूर्वक आणविले व त्यांच्या कायमनिवासाची उत्तम व्यवस्था केली.
१३ ऑगस्ट १६५७
शाहजी राजांच्या सुटकेनिमित्त दिलेला सिंहगड मराठ्यांनी
विजापूरकरांच्या ताब्यातून पुन्हा जिंकून घेतला.
१४ ऑगस्ट १६५७
रघुनाथ बल्लाळ अत्रे यांनी दंडाराजपुरी जिंकली. जंजिरा जिंकण्याचा
पहिला प्रयत्न फसला.
१५ ऑगस्ट १६६०
शाईस्तेखानाने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला
सुमारे ५५ दिवसांच्या प्रखर संघर्षानंतर हाती आलेला संग्रामदुर्गाची पाहणी करण्यासाठी शाहिस्तेखान किल्ल्यावर आला. संपूर्ण पाहणी करून त्याने या किल्ल्याचे नाव ठेवले "इस्लामगड".
या किल्ल्यासाठी मोगली फ़ौजेला मराठी सरदार फ़िरंगोजी नरसाळ्याशी प्रखर संघर्ष करवा लगला होता. किल्ल्याचा बुरूज उडवून बालेकिल्ल्यात घुसलेल्या २०००० मोगली फ़ौजेपुढे ५००-७०० मराठे झुंजत होते.
फ़िरंगोजीच्या या शौर्यावर निहायत खूश होवून खानाने त्याला आपल्याला मिळण्याचे आवाहन केले,पण फ़िरंगोजी बधला नाही.तो राजांकडे राजगडावर निघून गेला.
५५ दिवस खान या एका भुईकोट किल्ल्याशी झुंजत होता प्रचंड फ़ौजेनिशी आणि मूठभर मावळ्यांविरोधात...
तरिही या लढाईत खानाचे २६८ हशम ठार तर सुमारे ६०० जखमी झाले होते....यालाच म्हणतात मराठी रक्त.
सुमारे ५५ दिवसांच्या प्रखर संघर्षानंतर हाती आलेला संग्रामदुर्गाची पाहणी करण्यासाठी शाहिस्तेखान किल्ल्यावर आला. संपूर्ण पाहणी करून त्याने या किल्ल्याचे नाव ठेवले "इस्लामगड".
या किल्ल्यासाठी मोगली फ़ौजेला मराठी सरदार फ़िरंगोजी नरसाळ्याशी प्रखर संघर्ष करवा लगला होता. किल्ल्याचा बुरूज उडवून बालेकिल्ल्यात घुसलेल्या २०००० मोगली फ़ौजेपुढे ५००-७०० मराठे झुंजत होते.
फ़िरंगोजीच्या या शौर्यावर निहायत खूश होवून खानाने त्याला आपल्याला मिळण्याचे आवाहन केले,पण फ़िरंगोजी बधला नाही.तो राजांकडे राजगडावर निघून गेला.
५५ दिवस खान या एका भुईकोट किल्ल्याशी झुंजत होता प्रचंड फ़ौजेनिशी आणि मूठभर मावळ्यांविरोधात...
तरिही या लढाईत खानाचे २६८ हशम ठार तर सुमारे ६०० जखमी झाले होते....यालाच म्हणतात मराठी रक्त.
किल्ला हातातून गेला तरी पराक्रमावर खुश होउन शिवाजी राजांनी फिरंगोजी
नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.
१५ ऑगस्ट १६६४
आदिलशाही सरदार खवासखानाला हुसकावून शिवाजीराजांनी कूड़ाळ-सावंतवाडी
जिंकली.
खवासखान बाजी घोडपडेला येउन मिळण्याआधी मुधोळ येथे बाजी घोरपडेला
मारून राजे कूड़ाळ प्रांती आले आणि तेथे खवासखानाला पराभूत केले.
शत्रूला एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून त्यांचा फडशा पाडणे यात
राजांचे रणकौशल्य दिसून येते.
१६ ऑगस्ट १६६२
अनाजी दत्तो प्रभुणीकर हे वाकनिशी करीत होते त्यांना शिवाजी राजांनी
सुरनिशीचा हुद्दा सांगितला.
१७ ऑगस्ट १६६०
विजापूरचा आदिलशाह शिवाजीराजे व सिद्दी जौहरचा (गद्दारीच्या संशयाने)
नायनाट करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने ससैन्य निघाला.
१७ ऑगस्ट १६६६
शिवाजी महाराज ९ वर्षांच्या शंभूराजांच्या चाणाक्ष बुद्धी आणि आई
भवानीचे आशीर्वाद यामुळे आग्र्यातून पेटाऱ्यातून पसार झाले.
१८ ऑगस्ट १७००
थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० - एप्रिल २८, इ.स. १७४०)
असा धुरंधर की ज्याचा कधी पराजय झाला नाही , ज्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते,
अशा रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल
युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर
भारतात विस्तारल्या.
अशा थोरले बाजीराव पेशवे तथा बाजीराव बाळाजी भट यांची आज जयंती !
थोरल्या बाजीरावांची मुद्रा - ॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥
उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यानी अतुल पराक्रम गाजवला.
असा धुरंधर की ज्याचा कधी पराजय झाला नाही , ज्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते,
अशा रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल
युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर
भारतात विस्तारल्या.
अशा थोरले बाजीराव पेशवे तथा बाजीराव बाळाजी भट यांची आज जयंती !
थोरल्या बाजीरावांची मुद्रा - ॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥
उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यानी अतुल पराक्रम गाजवला.
१९ ऑगस्ट १६६६
छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले
तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी
पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी पालकर
या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.
२० ऑगस्ट १६६६
शिवाजीराजांनी दख्खनेमध्ये येण्यासाठी 'नरवीर घाटी' हे मुघली ठाणे खोटे दस्तक दाखवून ओलांडले.
ह्या ठिकाणी ठाणेदार होता लतीफखान. आग्र्याहून पसार झाल्यावर शंभूराजांना
मथुरेमध्ये ठेवून अवघ्या ३ दिवसात राजांनी हे ठाणे ओलांडले.
तिकडे रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी
महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार आग्र्यामध्ये फुलौतखानाला सापडले. शिवाजी राजांचे
आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या
स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजी राजे
मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.
२१ ऑगस्ट १६६१
शिवाजी राजांनी सामराजपंतांच्या जागी नरहरी आनंदराव यांना पेशवाई तर
अनाजी दत्तो यांना वाकनिशी दिली. मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक केली.
२४ ऑगस्ट १६५७
औरंगजेबाकडून सर्व आदिलशाही बुडवली गेली तर तो अधिक प्रबळ बनेल व शहाजहाननंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून त्याची ताकद वाढेल, म्हणून दारा शुकोहने शहाजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला.
औरंगजेबाकडून सर्व आदिलशाही बुडवली गेली तर तो अधिक प्रबळ बनेल व शहाजहाननंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून त्याची ताकद वाढेल, म्हणून दारा शुकोहने शहाजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला.
२७ ऑगस्ट १६५६
रायगड फत्ते करून शिवाजी राजांनी चंद्रराव मोर्याची मग्रूर गर्दन
उडवली.
२७ ऑगस्ट १६७९
१६७९ च्या पावसाळ्यात माजगावच्या बंदराचे काही काम सुरु असल्याने
सुरक्षेच्या दृष्टीने इंग्रजांनी सिद्दीला आरमार सुरतला नांगरण्यास सांगितले व
सिद्दी आरमारासह सुरतेस गेला. शिवाजी महाराजांचे हेर या सर्व हालचालींकडे अत्यंत
बारीक नजर ठेवून होते आणि या वेळेचा फायदा उठवायचा असे ठरवून महाराजांनी साहित्य,
काही दारूगोळा व
आपली माणसे चौलच्या ठाण्यात जमवली. इंग्रजांच्या पोर्तुगीज आणि काही हिंदू
हेरांकडून ही माहिती इंग्रजांना कळली. हेरांनी स्पष्ट कळवले होते कि जर आज
शिवाजीला रोखले नाही तर पुढे हे प्रकरण आवघड होईल त्यामुळे याचा लवकर बंदोबस्त
करावा परंतु इंग्रजांनी हे प्रकरण फार मनावर घेतले नाही असे दिसते. कारण याच दिवशी
इंग्रजांनी मुंबईच्या रक्षणार्थ तैनात असलेली ‘हंटर’ नामक फ्रिगेट मंगळूरच्या एका व्यापाऱ्याला
भाडेतत्वावर दिली. दरम्यान पुढच्या ३-४ दिवसातच चौलला असणारा महाराजांचा ताफा सर्व
रिसाल्यासह खांदेरीवर उतरला. या दर्यावर्दी मावळ्यांचा प्रमुख होता मायनाक भंडारी.
मायनाक सोबत या वेळी सुमारे १५० माणसे व ४ लहान तोफा होत्या. हे कळताच इंग्रजांना
घाम फुटला आणि त्यांनी सप्टें १६७९ सुरुवातीला ही हकीकत सुरतेला कळवली तसेच नारायण
शेणवी नामक वकिलाला शिवाजीराजांच्या चौलच्या ठाणेदाराकडे निषेध नोंदवण्याकरिता
रवाना केले.
२७ ऑगस्ट १६९०
किल्ले जिंजीस जुल्फिकार खानाचे वेढे पडले
३० ऑगस्ट १६५९
च्या रात्री औरंगजेबाचा गुलाम नजर बेग आणि त्याच्या साथीदारांनी
दाराच्या तुरुंगाला भेट दिली. तेथे त्यांनी दाराच्या मुलाला दूर करून दाराचे
जागच्या जागी तुकडे केले. अश्या प्रकारे वारसाहक्काच्या युद्धात औरंगजेबाचा विजय
झाला.
३१ ऑगस्ट १७२५
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस.
अहिल्याबाई होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या
व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते.
माळवा प्रांताचा कारभार त्यांनी बांधला. त्या मल्हारराव होळकरांच्या सून होत. मुलाचे
मृत्युनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. भारतभरात त्यांनी
अनेक मंदिरे, घाट बांधली वा त्यांचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या स्मरणार्थ,
इंदूर विद्यापीठास
त्यांचे नाव दिलेले आहे.
अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट"
म्हणून ओळखतात.
(इ.स. १७२५ - इ.स.
१७९५, राज्यकालावधी
इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारताच्या,माळवा साम्राज्याची, होळकर घराण्याची 'तत्वज्ञानी राणी'
म्हणून ओळखली जाते.
तीच जन्म महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडतालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला.
तिने नर्मदातीरी, इंदोर च्या दक्षिणेकडील महेश्वर या ठिकाणी आपली
राजधानी हलविली. अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी
पडले. १२ वर्षांनंतर, तिचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यु पावले.तिने, आपल्या साम्राज्याचे तुंगांपासुन रक्षण केले. ती लढाईत
स्वतः सैन्याचे नेतृत्व केले.तिने,तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. ती
न्यायदानासाठी प्रसिद्ध होती. एकदा तर तिने स्वतः च्या मुलास त्याच्या दंड
करण्याजोग्या कामांमुळे त्यास हत्तीच्या पायदळी तुडविण्याची शिक्षा केली. राणी अहिल्यादेवी
हीने अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आणि महेश्वर,इंदोर ची सजावट केली. ती अनेक देवळांची
आश्रयदाती होती.त्यात,तीने तिच्या राज्याबाहेरही अनेक मंदिरांचे व इतर अनेक तिर्थक्षेत्री धर्मशाळांचे
बांधकाम केले. त्यापैकी,द्वारका , गुजरात , काशी च्या पुर्वेस गंगातीरावर वाराणसी ,उज्जैन मध्य प्रदेश, नाशिक महाराष्ट्र व परळी वैद्यनाथ महाराष्ट्र याचा प्रामुख्याने समावेश आहे. सोमनाथ चे अपवित्र व ध्वस्त
झालेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शिवाचे एक देऊळ बांधले जे सर्व हिंदूद्वारे
अजुनही पूजिल्या जाते.
No comments:
Post a Comment